Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

श्री कल्याण स्मृती

           काही दिवसांपूर्वी गडावर गेलो होतो. तेथे पायऱ्या चढताना श्री मारुती व गोमातेच्या मंदिराजवळून थोडे खाली गेले कि 'श्री कल्याण स्मृती' हे स्थान आहे . श्री समर्थांचे वस्त्र वाऱ्याने उडाले आणि ते जमिनीवर पडून मलिन होवू नये म्हणून श्री कल्याण स्वामींनी ते कड्यावरून झेप घेऊन हवेतच झेलले . त्यांची उडी ज्या ठिकाणी पडली ते स्थान म्हणजेच 'श्री कल्याण स्मृती' होय .
      काहीसे दुर्लक्षित आणि अप्रसिद्ध स्थान आजही श्री कल्याण स्वामींच्या गुरुभक्तीची साक्ष देत उभे आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा