Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीसखाराम महाराज रामदासी डोमगावकर

        || सद्गुरू श्रीसखाराम महाराज रामदासी डोमगावकर ||




      सद्गुरू योगीराज श्रीकल्याणस्वामी मठ, डोमगाव परंपरेमध्ये साधारणतः दोन शतकांपूर्वी सद्गुरू श्रीसखाराम महाराज रामदासी यांचा जन्म झाला .श्री सखाराम महाराज हे आत्मज्ञानी सत्पुरुष होते .ते कीर्तनभक्तीचे अलौकिक आचार्य होते . श्री सखाराम महाराज जेव्हा श्रीकल्याणस्वामींच्या समाधीसमोर कीर्तन करत असत त्यावेळी समाधीतून हुंकार ऐकू येत असत असे परंपरेने सांगितले जाते . श्रीसखाराम महाराजांनी रामगीता आणि पंचीकरण हे दोन ग्रंथ लिहिले आहेत.संत श्रीदासगणू महाराजांनी श्रीसखाराम महाराजांविषयी लिहिले आहे ....
रामदासीयांत मोठाची दिवा | जो की हा सखारामबावा ||
       वेदेश्वरी,आगमसार,संकेत कुबडी इत्यादी ग्रंथ लिहिणारे श्रीनारायणहंस तथा श्री हंसराज स्वामी हे श्रीसखाराम महाराजांचे अंतरंग स्नेही होते.त्यांच्याच आग्रहावरून श्रीहंसराजस्वामी डोमगाव मठामध्ये अनेक वर्षे वास्तव्यास होते .तेथेच ही ग्रंथ रचना झाली .श्रीसखाराम महाराजांचे नातू श्रीदत्तात्रय महाराज यांचे कडून प.प.भगवान श्रीधर स्वामी यांचे पूर्वाश्रामातील पिता आणि काका श्री वामनराव तसेच श्री  नारायणराव पत्की यांनी अनुग्रह घेतला होता.श्री सखाराम महाराज हे जणू डोमगाव मठाच्या मठपती घराण्याचे कुलपुरुषच आहेत.
       श्रीसखाराम महाराज भोईगुडा,हैद्राबाद येथे स्वहस्ते स्थापन केलेल्या श्रीमारुतीसमोर अनुष्ठान करून फाल्गुन शुद्ध अष्टमी शके १७६२, सन १८४० रोजी स्वरूपी लीन झाले .तेथे त्यांचे भव्य समाधी मंदिर आहे .
       आजपासून श्रीसखाराम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सुरु झाला आहे .या वर्षीच्या उत्सवामध्ये श्रीमहाराजांची एक विशेष सेवा घडली आहे.श्रीसखाराम महाराजांचे एक मध्ययुगीन शैलीमधील चित्र उपलब्ध आहे.त्याच चित्राचे सखोल अध्ययन करून समर्थभक्त चित्रकार श्री गोपाळराव नांदुरकर यांनी श्रीसखाराम महाराजांचे नवीन चित्र काढले आहे.एका सद्भक्ताने हे चित्र श्रीमहाराजांच्या चरणी अर्पण केले आहे.त्याचे अनावरण दि.२३-२-२०१८ ,फाल्गुन शुध्द अष्टमी शके १९३९ या पुण्यतिथीच्या दिवशी भोईगुडा, हैद्राबाद मठामध्ये होत आहे .
||सद्गुरू समर्थ रामदास योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय ||
||सद्गुरू श्री सखाराम महाराज की जय ||
||जय जय रघुवीर समर्थ||  




    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा