समर्थ रामदास स्वामी हे योगेश्वर होते. त्यांना मंत्रयोग पूर्णत: अवगत होता. मंत्रविज्ञानाच्या सहाय्याने आजारांची चिकित्सा आणि उपचार केले जातात. याची प्रचिती देणारा एक प्रसंग
सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे श्रीसमर्थांचे असताना एक दिवस अचानक जवळच असलेल्या तारळे खोऱ्यातील सर्व शिष्याना थंडीतापाच्या साथीने(शैत्य) ग्रासले. हे श्रीकल्याणस्वामींनी श्रीसमर्थांना कळविताच त्यांनी एक मंत्र लिहून श्रीकल्याणस्वामींकरवी शिष्यांना पाठविला. तो मंत्र श्रीकल्याणस्वामींनी सर्वांना ऐकविताच त्यांचा रोग बरा झाला असा उल्लेख श्रीदासविश्रामधाम या प्राचीन ग्रंथात आढळतो. सदर मंत्र शोधून काढून धुळ्याच्या समर्थहृदय श्री. शंकर श्रीकृष्ण देवांनी शके १८७१ मध्ये श्रीसमर्थअवतार या ग्रंथात १२५ व्या पानावर छापला आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे.
इंद्रनीळरंग राम शाम धाम योगिया ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा