वरील छायाचित्र श्री कल्याण स्वामी श्री समर्थांना ज्या चंचीतून पान देत असत त्याचा आहे. हि चंची परंपरेने डोमगाव मठामध्ये होती . तत्कालीन मठपती श्री हनुमंत श्रीराम उपाख्य बप्पासाहेब जहागीरदार रामदासी यांनी समर्थवंशज श्री भाऊसाहेब स्वामी यांच्या आज्ञेने हा अमोल ठेवा प्रख्यात चित्रकार ,संतवस्तू संग्राहक व अध्यात्मिक अधिकारी व्यक्तिमत्व असलेल्या श्री डी .डी .रेगे यांना सन १९९२ साली संतवस्तू संग्रहासाठी दिला.
प्रस्तुत संतवस्तू संग्रहालय एक विलक्षण आश्चर्यकारक ठिकाण आहे. येथे ७० संतांच्या नित्य वापरातील १५० वस्तू (पादुका,काठी,वस्त्र ,जपमाळ ,टोपी इत्यादी ) या संतांमध्ये श्री रामदास स्वामी ,श्री कल्याण स्वामी,श्री स्वामी समर्थ,श्री गजानन महाराज,श्री गोंदवलेकर महाराज,श्री गोविन्दकाका उपळेकर महाराज स्वामी स्वरूपानंद, श्री दासगणू महाराज असे अनेक जण आहेत.
हे संत वस्तू संग्रहालय श्री . डी .डी . रेगे यांच्या अथक परिश्रमातून साकारले आहे. पुण्यात आल्यावर आवर्जून पहावे असे स्थान आहे. त्याचा पत्ता व वेब साईट खालील प्रमाणे .
http://www.ddregemuseum.org
D. D. Rege Museum / D. D. Rege Sant Vastu Sangrahalaya
Ratan Enclave Row House No. 1.
B. T. Kawade Road,
Near Kalashankar Nagar,
Ghorpadi Village, Pune-411001’
Contact Person : Shivdurga A. Marathe (+91-09823732619)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा